भाजपाचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपाचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी स्वत:वर गोळी झाडून त्यांनी  आत्महत्या केली. बियाणी यांना खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचा जीव डॉक्टर वाचवू शकले नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे भगीरथ बियाणी नेहमी हसतखेळत कर्तृत्व निभावणारे व्यक्तीमत्व म्हणून पाहिले जाते. या दुर्देवी घटनेने बीड शहरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.