
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
चंद्रपूर शहरात रस्त्यावर एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. शहरातील जिल्हा परिषद इमारतीच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपासमोर या दुचाकीने पेट घेतला. दुचाकीस्वार नादुरुस्त गाडीला किक मारत असताना दुचाकीने अचानक पेट घेतला. दुचाकीने पेट घेतल्याचे कळताच पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि चंद्रपूर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. दुचाकीनला लागलेल्या आगीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.





























































