
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अखेर भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, सुभाष भामरे यांचा समावेश आहे. तसेच यंदा भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट पक्षाने कापले असून त्यांच्या मतदारसंघातून पक्षाध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवणार आहेत.
Union Minister and BJP leader J P Nadda: 182 candidates will be declared today, PM Modi to contest from Varanasi, Amit Shah from Gandhinagar, Rajnath Singh from Lucknow, Nitin Gadkari from Nagpur. pic.twitter.com/KwRjH6s0Ri
— ANI (@ANI) March 21, 2019
गेल्या काही दिवसांपासून भाजपची केंद्रिय निवड समितीची बैठक सुरू होती. चर्चेच्या अनेक फेर्यानंतर पक्षाने 182 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी वाराणसीतून, नितीन गडकरी नागपूरमधून, मथुरामधून हेमा मालिनी, राजनाथ सिंह लखनौमधून तर धुळ्यातून सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट पक्षाने कापले असून त्यांच्या ऐवजी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर मधून निवडणूक लढवतील.
स्मृती इराणी अमेथीतून, व्ही.के.सिंह गाझियाबादमधून, साक्षी महाराज उन्नावरमधून, अर्जुन मेघवाल बिकानेरमधून, राज्यवर्धन राठोड जयपूरमधून निवडणूक लढवतील.
भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर, दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट
महाराष्ट्रात रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे – सुभाष भामरे, अकोला- संजय धोत्रे, वर्धा- रामदास तडस, गडचिरोली- अशोक नते, चंद्रपूर- हंसराज अहिर, जालना- रावसाहेब दानवे, भिवंडी- कपील पाटील, मुंबई उत्तर- गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर मध्य- पुनम महाजन, नगर- सुजय विखे पाटील, बीड- प्रितम मुंडे, सांगलीमधून संजय काका पाटील यांना उमेदवार जाहीर केली आहे. लातूरमधून विद्यमान खासदार सुनिल गायकवाड यांचे तिकीट कापले असून पक्षाने सुधाकरराव श्रुंगारेंना संधी दिली आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव नाही
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटिल यांनी आपले पुत्र रणजितसिंह सह भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने या यादीत अजून रणजितसिंह यांचे नाव जाही केलेले नाही.

























































