देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होईपर्यंत भाजपच सत्तेत राहणार! राम माधव यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, आगरतळा

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी भाजपची सत्ता पुढची 28 वर्ष कायम राहणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. एका जाहीर सभेत बोलताना राम माधव म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील तेव्हा भाजपच सत्तेत असेल. लोकसभा निवडणुकीत त्रिपुरातील दोन्ही जागा जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये बोलत असताना राम माधव यांनी हे विधान केले आहे.

“देशामध्ये सगळ्यात जास्त काळ काँग्रेस सत्तेत राहिली आहे. 1950 ते 1977 या काळात काँग्रेसने सत्ता उपभोगली आहे. नरेंद्र मोदी हा रेकॉर्ड मोडतील आणि भाजप हा 2047 पर्यंत सत्तेत राहील” असे राम माधव यांनी या सभेत म्हटले.