
गुणवत्ताधारकांच्या पाठीशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठीशी उभे राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्मृतिसुमने उधळली.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने 125 रुपयांचे नाणे जारी केले आहे. अमरावतीमध्ये आयोजित कार्यक्रमात पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होते. यानिमित्ताने विशेष नाण्याचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तर शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आला.
पुरस्काराने उंची गाठली
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे नाव आहे. कृषिमंत्री राहिलेले शरद पवार यांचेही कृषी क्षेत्रात मोठे नाव आहे. पंजाबराव देशमुखांच्या नावाने शरद पवार यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे. पण शरद पवार यांच्या उंचीची माणसे दरवर्षी कुठे मिळणार, अशी विचारणा नितीन गडकरी यांनी केली.

























































