हिमाचलमधील चुरा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार हंसराज यांच्यावर बूथ अध्यक्षांच्या मुलीने अश्लील चॅट केल्याचा आरोप केला आहे. आमदाराने अश्लील चॅटींग करत माझ्याकडून न्यूड फोटो मागितले. मुलीने नकार दिल्यानंतर हंसराज यांनी तीला धमक्या दिल्याचा आरोपही मुलीने केला असून चंबा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हंसराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी हंसराज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा माबाइल बंद आढळून आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते भूमिगत झाल्याचा पोलिसांना संशय आहे.