होळी खेळून आलेल्या भाजप आमदारावर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

सर्व देश होळीच्या रंगात रंगला असताना उत्तर प्रदेशमध्ये भाजप आमदारावर गोळीबार झाला आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपुरचे आमदार योगेश शर्मा यांच्यावर गोळीबार झाला असून त्यांना जवळच्याच इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

आपल्या विधानसभा मतदारसंघातून आमदार योगेश शर्मा आपल्या साथीदारांसह कार्यालयात जात होते. तेव्हा त्यांनी गुरु नानक इंटर कॉलेज जवळ पान खाण्यासाठी गाडी थांबवली आणि आणि दुकानाकडे जाताना त्यांच्यावर कोणीतरी गोळी झाडली. शर्मा यांच्या डाव्या पायाला गोळी चाटून गेली. त्यानंतर याभागत धावपळ उडाली. आमदारांच्या साथीदारांनी त्यांना तुलसी मेमोरियल इस्पितळात दाखले केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढी तपास सुरू आहे. आमदार शर्मा यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.