भाजप आमदार नितेश राणे शरण जाणार, वकिलांची कोर्टात माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला होता. मात्र जामीनासाठी राणे यांची धावाधाव सुरूच होती. त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर भाजप आमदार नितेश राणे पोलिसांना शरण जाणार अशी माहिती त्यांच्या वकिलांनी हायकोर्टात दिली. त्याबरोबर याचिका निकालात निघाली आहे.

दरम्यान, मंगळवारी निकालानंतर नोटीस, कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी पोलिसांनी त्यांची गाडी अडवून ठेवल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे आणि पोलिसांची बाचाबाची झाली होती. यावेळी कोर्ट परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला होता.

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेला जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आहे. अटक टाळण्यासाठी राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने ते पुन्हा उच्च न्यायालयात
गेले होते.