पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याचा खून, झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पश्चिम बंगालमध्ये एका भाजप कार्यकर्त्याचा खून झाला आहे. कार्यकर्त्याचे नाव गणेश रॉय असून तो आरामबाग जिल्ह्याच्या रहिवासी होता. गणेशचा मृतदेह झाडला लटकलेल्या अवस्थेत आढला. भाजपने या प्रकरणी पुन्हा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे.

भाजपने एक व्हिडीओ ट्विट करून म्हटले आहे की राज्यात पुन्हा लोकशाहीचा खून झाला आहे. राज्यात भाजप कार्यकर्त्याचा खून झाला आहे. या राजकीय हत्या थांबल्या पाहिजे. जे लोक लोकशाहीच्या खुनावर आरडाओरड करत असतात त्या गृहमंत्री ममता बॅनर्जी यावर गप्प आहेत असे भाजपने म्हटले आहे. पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही राज्याच्या पोलिसांवर टीका केली आहे. पोलिसांनी राजीनामा देऊन भाजी विकावी असे घोष म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या