काळा घोडा महोत्सवाची सुनावणी लांबणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काळा घोडा कला व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनासंबंधी उच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. महोत्सव आयोजित करण्यास परवानगी मागणाऱया आयोजकांच्या याचिकेवर बाजू मांडण्यासाठी सरकारने शुक्रवारी आणखी वेळ मागितला. त्यावर सुट्टीकालीन खंडपीठाने सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब केली. दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदानावर 15 ते 19 जानेवारी या कालावधीत काळा घोडा महोत्सव आयोजित करण्यास परवानगी द्या, अशी विनंती करीत काळा घोडा आर्ट असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. असोसिएशनच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती शिवकुमार डिगे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारतर्फे ऍड. ज्योती चव्हाण यांनी याचिकेवर बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागितला. सरकारची ही विनंती मान्य करीत खंडपीठाने सुनावणी आठवडाभर तहकूब केली.