
सामना प्रतिनिधी । मुंबई
जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 आणि ‘35-ए’ कलम हटवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना आज पालिकेच्या सुधार समितीतही ‘भारत माता की जय’चा नारा घुमला. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
कश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्याबद्दल भाजपचे नगरसेकक अभिजित सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराक मांडला. या प्रस्तावावर मत व्यक्त करताना शिवसेनेसह भाजपच्या सर्व सदस्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले. शिकसेनेचे राजू पेडणेकर, श्रद्धा जाधक, बाळा नर यांनी, तर भाजपचे हरीश छेडा, अतुल शहा, ज्योती अळकणी यांनी ठराकाला पाठिंबा दिला. राजू पेडणेकर, श्रद्धा जाधक, बाळा नर यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी काजपेयी, लालकृष्ण आडकाणी यांचे स्कप्न साकार झाल्याचे म्हटले. अतुल शहा म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्काखालील सरकार गतिशील आहे. या सरकारने तिहेरी तलाक पद्धत आणि 370 क ‘35-ए’ कलम रद्द करून एक इतिहास घडकला. आता तेथे पर्यटनाला चालना मिळेल आणि जनतेमध्ये समृद्धी येईल, असे सांगतानाच उद्योगधंद्याच्या दृष्टीने नोक्हेंबरमध्ये इन्क्हेस्टर कमिट होणार असल्याचे म्हटले. काँग्रेसचे जाकेद जुनेजा आणि अश्रम आझमी यांनी या ठराकाकर किचार करताना कश्मीरप्रमाणे नॉर्थ-ईस्ट हिंदुस्थानातील नागालॅण्ड, सिक्कीम, अरुणाचल, हिमाचल राज्यांतील नियमांचा मुद्दा उपस्थित केला. अश्रफ आझमी यांनी कश्मीरप्रश्नी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मत घुसडण्याचा प्रयत्न करताच शिकसेना-भाजपचे नगरसेकक आक्रमक झाले. यावेळी ‘भारत माता की जय’चा एकच नारा घुमला.


























































