पवई, मरीन लाइन्स ब्रिजवर हातोडा, आठवडाभरात मुंबईतील सर्व धोकादायक पूल तोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल दुर्घटनेत सहा जणांना नाहक जीव गमवावा लागल्यानंतर पालिकेने मुंबईभरातील सर्व 18 धोकादायक पूल तातडीने तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पवई आणि मरीन लाइन्स येथील पादचारी पूल तोडण्यात आले असून शिल्लक धोकादायक पूल आठवडाभरात तोडण्यात येणार आहेत.

‘हिमालय’ पादचारी पूल दुर्घटना ‘बोगस स्ट्रक्चरल ऑडिट’मुळे घडल्याचे समोर आल्यानंतर पालिकेने शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सर्व 262 पुलांचे पुन्हा नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र आधीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अतिधोकादायक ठरलेले पूल प्राधान्याने तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

असे होतेय काम
मरीन लाइन्स चंदनकाडी येथील धोकादायक पूल होळीनिमित्त असलेल्या सुट्टीच्या काळात पालिकेने तोडला. पकई तलाक येथील पादचारी पूलही दोन दिकसांपूर्की पाडण्यात आला आहे. मरीन लाइन्स दक्षिणेकडील पूलही पाडण्याचे काम सुरू आहे. त्याचा वाहतुकीला फटका बसू नये यासाठी रात्री पूल पाडण्याचे काम सुरू आहे.

असे आहेत धोकादायक पूल…
हंसभुग्रा मार्ग – वाकोला, हरी मस्जिद नाला – साकीनाका, वालभट नाला – गोरेगाव पूर्क, आकुर्ली रोड – कांदिवली, मरीन लाइन्स (उत्तरेकडील), मरीन लाइन्स (दक्षिण), चर्नी रोड स्थानक पादचारी पूल, ओंकारेश्वर मंदिर – कांदिवली, बर्वे नगर -घाटकोपर पश्चिम पादचारी पूल, विठ्ठल मंदिर – इराणीवाडी, एसव्हीपी रोड- कांदिवली, एसबीआय कॉलनी – दहिसर.