कंत्राटदारासाठी नियमित कामगारांना रस्त्यावर आणले, आज ‘काम बंद’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-building

सामना प्रतिनिधी । मुंबई

कंत्राटदारासाठी कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये साफसफाई आणि कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या हजारो नियमित कर्मचाऱ्यांना काम थांबवण्याचे आदेश देणाऱया पालिका प्रशासनाविरोधात कामगार आक्रमक झाले असून उद्या तिन्ही विभागांत ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. उद्याच्या दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर सर्व 24 विभागांत ‘काम बंद’ आदोलन करू असा इशारा समन्वय समितीने दिला आहे.

मुंबईतील कचरा कमी झाल्याचे सांगत पालिकेने कचरा उचलणाऱया गाडय़ा कमी केल्याने मुंबईत अनेक ठिकाणी कचऱयाचे ढीग साचले आहेत. असे असताना कचरा उचलणे, साफसफाईची कामे कंत्राटदाराकडून करून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र ही कामे कंत्राटदाराकडून करून घेतली जाणार असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नियमित आणि प्रामाणिकपणे काम करणाऱया शेकडो कर्मचाऱयांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सेक्रेटरी संजय वाघ यांनी सांगितले. यामध्ये ‘कायम’ कर्मचाऱयांचे इतर ठिकाणी समायोजन करण्यात येणार असले तरी हंगामी कर्मचाऱयांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

पालिकेच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात काम बंद आंदोलन करणार असल्याचे आज समन्वय समितीचे बाबा कदम, सुखदेव काशिद, महाबळ शेट्टी यांनी जाहीर केले आहे.

पालिका कायदा धाब्यावर

नियमित कर्मचाऱयांना काम बंद करण्यास सांगताना किंवा त्यांचे इतर ठिकाणी समायोजन करताना पालिका कायद्यानुसार त्यांना नोटीस देणे, चर्चा करणे अनिवार्य आहे. मात्र पालिका प्रशासनाने हंगामी कर्मचाऱयांना काम बंद करण्याचे तर पर्मनंट कर्मचाऱयांना अचानक इतर विभागात समायोजन करीत असल्याचे सांगितले. पालिका कायदा धाब्यावर बसवून हा निर्णय घेण्यात आल्याचे संजय वाघ म्हणाले.

प्रलंबित मागण्या पूर्ण करा

सफाई विभागात अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा ताण येत आहे. शिवाय कंत्राटी कामगारांना पुरेसे वेतनही दिले जात नाही. त्यामुळे पालिकेने या कामांसाठी कंत्राटदार न आणता या कर्मचाऱयांना आवश्यक सोयीसुविधा द्याव्यात अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली आहे. नियमित काम करणाऱया कर्मचाऱयांना ते काम करीत असलेल्या ठिकाणीच काम द्यावे असेही ते म्हणाले.

…तर कारवाई होणार

‘परिमंडळ 7’ मध्ये म्हणजेच ‘आर दक्षिण’, ‘आर मध्य’ क ‘आर उत्तर’ या तिन्ही प्रशासकीय विभागांमध्ये ‘टर्न-की कंत्राट’ दिल्यानंतर संबंधित सर्व कामगारांना ते सध्या कार्यरत असलेल्या विभागांमध्येच त्यांच्या आधीच्या कामाच्या स्वरूपाचेच काम देण्यात आले आहे. मात्र असे असूनही जे कामगार पालिकेच्या नियमित कामात अडथळा आणतील त्यांच्यावर महापालिका सेवा नियमावलीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले आहे.