अजय देवगण काजोलला म्हणाला ‘म्हातारी’, यावर ती काय म्हणाली? पाहा व्हिडीओ..

20648

अभिनेता अजय देवगण आणि काजोलची जोडी बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. अजय देवगण आणि काजोल यांचा स्वभाव एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळा आहे. काजोल खूप बोलक्या स्वभावाची आहे, तर अजय हा शांत स्वभावाचा आहे. मात्र आता यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अजय हा काजोलला ‘म्हातारी’ म्हणाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजय आणि काजोल ‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये आले होते. याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अजयने काजोलच्या फोटो एडिट करण्याच्या सवयीवर तिची मस्करी करताना दिसत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की अजय हा करण जोहरला बोलत बोलताना दिसत आहे की, ‘मला काजोलचे फोटो क्लिक करण्यात कोणतीही अडचण नाही. पण अडचण अशी आहे की फोटो क्लिक केल्यानंतर ती तीन तास तो फोटो एडिट करत राहते. जेणेकरून ती तो सोशल मीडियावर पोस्ट करू शकेल.’ पुढे तो म्हणाला आहे की, ‘मला हे समजत नाही की, तिने तिच्या आयुष्यात असे कधी केले नाही. आता ती म्हातारपणात असं का करते?’

अजयचे ऐकून काजोल कुठे गप्प बसणार होती. काजोलला अजय म्हातारी म्हणताच ती लगेच यावर बोलली की, ‘तुझं म्हातारपण आलं असेल, माझं नाही’. हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘स्टार वर्ल्ड’च्या इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या