बोनी कपूरने अभिनेत्रीला केला चुकीच्या पद्धतीने स्पर्श, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती व प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा अभिनेत्री उर्वशी रौटेला हिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते जयंतीलाल गडा यांचा मुलगा अक्षय याच्या लग्नात हा प्रकार घडला असून सर्व फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात तो कैद झाला आहे.

उर्वशी व बोनी कपूर हे अक्षयच्या लग्नात एकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांनी फोटोग्राफर्सला फोटोसाठी एकत्र पोझ देखील दिली. मात्र फोटो काढून निघत असताना बोनी यांनी उर्वशीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच झापले आहे.

दरम्यान या घटनेनंतर उर्वशीने सोशल मीडियावरून बोनी कपूर यांची बाजू मांडली आहे. बोनी कपूर हे एक सदगृहस्थ असून तसेच अशा चुकीच्या बातम्यांमुळे तिला धक्का बसल्याचे देखील तिने म्हटले आहे.