स्त्रीमुक्तीची गाथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शशिकान्त लोखंडे

स्वतःच्या निराळेपणाची, ‘स्व’त्वाची प्रखर जाणीव अभिव्यक्त करणे ही विद्यमान कालीन समाज आणि संस्कृतीमधील महत्त्वाची जीवकेंद्रीय संकल्पना आहे. ‘स्व’त्व-जाणीव’ ही दुहेरी असते. स्वतःचे स्वेतरांशी असणारे सारखेपण आणि इतरांकडून असणारे वेगळेपण जाणवते तेव्हा विकसनशील स्त्री बंधमुक्त होऊ पाहते. वस्तुतः मनुव्यवस्थाशरण समाजात कोणत्याही स्त्रीला ‘स्व’त्वाची जाणीव फारशी नसते, जी असते ती पुरुष संस्कृतीला शरण जाण्यासाठी. स्त्रियांच्या जीवन-जाणिवांमधील वेगळेपण शोधणे म्हणजे त्यांच्या ‘स्व’त्वाचा (स्त्राrत्वाचा नव्हे) शोध घेणे होय. ‘पद्मा देसाई’ यांच्या ‘बंधमुक्त होताना’ या स्वकथनाचा यादृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. त्यांच्या ‘Breaking out’ (बेकिंग आऊट) या इंग्रजी स्वकथनाचा उत्तम अनुवाद मान्यवर अभ्यासक सुनंदा अमरापूरकर यांना मराठीत केला आहे.

पुरुषसत्ताक घटितातून स्त्रीला सहजपणे बंधमुक्त होता येत नाही. त्यात यश मिळतेच असे नाही; परंतु मनसामर्थ्याच्या जोरावर किमान बंधमुक्तीची जाणीव तरी स्त्रीला जोपासावी लागते. पद्मा देसाई यांच्या या स्वकथनात विशिष्ट विषय, समस्या, बंध यांचे तपशील येतात. इतकेच नव्हे, तर पारंपरिक हतबल स्त्री आणि बंधमुक्तीचा संघर्ष करणारी स्त्राr यांच्या दृष्टिकोनातील मूलभूत फरक या स्वकथनाच्या तळाशी आहे. यात कालिक प्रभाव या घटकाला महत्त्व आहे. म्हणून हे लेखन कथा, गोष्ट, कहाणी ठरत नाही, तर ते ‘स्त्रीवादी’ जाणिवेचे दर्शन आहे,‘एक विचार’ आहे.

स्त्राr ही समाजात पुरुषांच्या आक्रमक सत्तेशी अनेक प्रकारच्या नात्यांनी अडकलेली आहे. तिची ‘मानुषता’ दग्ध केली गेली आहे. हे जीवशास्त्राrय नसून संस्कृतीनिर्मित आहे. नैसर्गिक शारीरिक रचनतेतील भेदामुळे स्त्रीला दुय्यम स्थानी ठेवले गेले आहे. या स्वकथनाच्या रूपाने समाजातील सांस्कृतिक घटकांचा अन्वयार्थ स्पष्ट होतो. ‘माणूस’ म्हणून स्त्रीला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवू पाहणाऱया कुटुंबाचेही येथे विश्लेषण आहे.

सुरत प्रांतातील एका पारंपरिक गुजराती ब्राह्मण कुटुंबात 1930 तीसच्या आसपास पद्मा देसाईंचा जन्म आहे. सुरक्षित-कर्मठ वातावरणात या वाढल्या तरी शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर त्यांना विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. मुंबई विद्यापीठात शिकत असताना त्या एका परिचित तरुणाच्या मोहजालात पूर्णपणे फसतात. देसाई यांना परिचिताशी परिस्थितीवश लग्नही करावे लागते, पण पुढे हे वैवाहिक जीवन दुःखाची ‘काहिली’ बनते. त्यांना संबंधातून गुप्तरोग होतो. स्त्री म्हणून तिचे स्वत्व मारले जाते. याविषयी लग्नबंधनातून सुटण्यासाठी पद्मा देसाई ख्रिश्चन धर्मही स्वीकारतात. तथापि इच्छास्वातंत्र्य असूनही त्यांना ‘घटस्फोट’ मिळत नाही. दरम्यान, त्यांना अमेरिकन शिष्यवृत्ती मिळते. हा अंधारातील एक प्रकाश किरणच. जागृत मनाच्या शिक्षणामुळे त्यांना आपल्या स्वत्वाची-सत्त्वाची जाणीव होते. लेखिकेकर तिचे कडील, आई आणि काकी यांचा आयुष्यभर प्रभाक होता, हे जाणकते. किसाक्या शतकात हिंदुस्थानसारख्या देशात स्त्री म्हणून कैयक्तिक स्कातंत्र्यासाठी काही निणऱय घेणे तेकढे सोपे नक्हते. परंतु समाजाला, परंपरांना न जुमानता लेखिकेने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले.

याच वाटेने जाताना त्यांना एक समंजस अर्थतज्ञ व्यक्ती भेटते. दोघे विवाहबद्ध होतात. याबरोबरच हार्वड आणि कोलंबियासारख्या विद्यापीठातून पद्मा देसाई यांना नावलौकिक प्राप्त होतो. अमेरिकेत वास्तव्य केल्यामुळे तेथील जीवनशैली, संस्कृती-समाजाशी एकरूप होतात. तरीही विशेष म्हणजे न विसरता येणारे हिंदुस्थानीत्व. परंपरांच्या बंधनातून मुक्त होऊन स्कतःला सिद्ध करणाऱया या किदुषीचे आत्मचरित्र प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायक ठरेल.

बंधमुक्त होताना…
लेखक – पद्मा देसाई
अनुवाद – सुनंदा अमरापूरकर
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ – 240, मूल्य – रुपये 295/-