Photo – स्वतःशीच लग्न करणारी मॉडेल घेतेय आता घटस्फोट, कारण आले समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांगला मुलगा न मिळाल्याने एका ब्राझिलियन मॉडेलने स्वतःशीच लग्न केले होते. परंतु या मॉडेलने आता स्वतःशीच घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे.


33 वर्षीय ब्राझिलियन मॉडेल क्रिस गॅलेराने सप्टेंबरमध्ये स्वतःशीच लग्न केले होते. आतापर्यंत अनेक पुरुषांवर आपण विश्वास ठेवला, परंतु लग्नासाठी एकही चांगला मुलगा मिळाला नसल्याची खंत तिने व्यक्त केली होती. म्हणून सप्टेंबर महिन्यात स्वतःशीच लग्न केले होते.


परंतु क्रिसने आता स्वतःशीच घटस्फोट घेतला आहे. तसेच तिच्यावर प्रेम करणारा एक जीवनसाथी तिला मिळाला असून ते दोघे लवकरच लग्न करणार आहे.


ही व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्याने प्रेमावर आपला विश्वास दृढ झाल्याचे क्रिसने म्हटले आहे.


स्वतःशीच लग्न केल्यावर क्रिस खूप खूश होती. ब्राझीलच्या एका चर्चमध्ये तिने स्वतःशीच लग्न करून त्याचे फोटो सोशल मीडियावरही पोस्ट केले होते.


तिच्या या फोटोवर अनेकांनी तिचे कौतुक केले होते. तसेच अनेकांनी हा मुर्खपणा असल्याचेही म्हटले होते.