बेस्ट कर्मचाऱ्याविरोधात लाचखोरीचा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best bus

लाचेची मागणी केल्याप्रकरणी बेस्ट कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई युनिटने गुन्हा नोंद केला आहे. त्या कर्मचाऱ्याची लवकरच चौकशी केली जाणार आहे.

तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या मालकीचे एक कॅफे आहे. त्या कॅफेच्या जागेचे तीन महिन्यांचे त्यांनी बिल भरले नव्हते. तीन महिन्यांच्या थकबाकी बिलाची रक्कम 45 हजार 280 रुपये इतकी होती. काही दिवसांपूर्वी बेस्टच्या एका कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी भेट दिली होती. तसेच बेस्टचे वीज मीटर बंद करून काढून घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
तेव्हा तक्रारदार यांनी त्याला वीज मीटर काढून नेऊ नये अशी विनंती केली होती. त्यासाठी त्यांच्याकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. लाचेची इच्छा नसल्याने त्यांनी गेल्या वर्षी मुंबई युनिटकडे तक्रार केली होती.