बामरडा गावातील पूल कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला

38
प्रातिनिधिक फोटो

प्रसाद नायगांवकर । मारेगाव

यवतमाळमधील मारेगाव तालुक्यातील बामरडा गावात मुसळधार पावसामुळे गावाला जोडणारा पूल कोसळला आहे. गावाला जोडणारा पूलच कोसळल्यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. तसेच गावातील नदीला देखील पूर आला असून बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महाविद्यालयांमध्ये सध्या अॅडमिशन सुरू आहेत मात्र पूल कोसळल्यामुळे अॅडमिशनसाठी जायचे असलेले विद्यार्थी देखील रखडले आहेत. या पुलाबाबच्या परिस्थितीबाबत गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला व संबंधित विभागाला कळविले होते मात्र तरिही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

या गावी जाण्यासाठी पूलाचा एकमेव रस्ता आहे व गावामध्ये ये-जा करायचे म्हटल्यास तो रस्ता पार करून ये-जा करावी लागते. पण आता पूल कोसळल्यामुळे रस्ता पार करुन जाण अशक्य झालेलं आहे.तसेच नदीतील पाण्याची पातळी देखील वाढली असून पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे. या गावातील दिनेश सोनूले व गजु पिदूरकर या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे?

आपली प्रतिक्रिया द्या