100 रुपयांच्या ड्रेसवरून भावाची बहिणीला अमानुष मारहाण, डोळे फोडले

1244

रक्षाबंधनाला अवघे काही दिवस बाकी असतानाच राजधानी नवी दिल्लीमध्ये बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 100 रुपायांच्या ड्रेसवरून 20 वर्षीय भावाने 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीला अमानुष मारहाण करून तिचे डोळे फोडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली महिला आयोगाने याबाबत माहिती दिली असून पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे. हे कुटुंब मुळचे बिहारचे असल्याचेही समोर आले आहे.

हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली महिला आयोगाचे सदस्य प्रत्येक घरात जाऊन भेट घेत असताना आयोगाच्या महिला पंचायतने एक मुलगी जोरजोरात रडत असल्याचे ऐकले. त्यांनी शेजारी चौकशी केली असता तरुण नेहमीच आपल्या बहिणींना मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पंचायत टीमने महिला आयोगाच्या कार्यालयात फोन केला आणि पीडितेच्या घरी गेले. त्यांनी घरात जाण्याचा प्रयत्न केला असता तरुणाने त्यांच्याशी गैरवर्तवणूक करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा विरोध झुगारून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना धक्काच बसला.

घरात मुलगी घरात जमिनीवर पडली असल्याचे महिला आयोगाने पाहिले. जखमा झाल्याने तिचा चेहरा सुजला होता. तसेच रक्तस्त्रावही सुरु होता. पीडितेच्या भावाने तिला घरात बंद करुन ठेवले होते आणि कोणतीही वैद्यकीय मदत मिळू दिली नव्हती. पीडित मुलीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाति मालीवाल यांनी पीडितेची तिथे भेट घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या