
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये कोणत्या सेक्टरला झुकते माप मिळणार? हे पाहणे औत्सुकतेचे असणार आहे. अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवरही परिणाम होतो. त्यामुळे या दिवशी कोणते शेअर घ्यावेत? कोणते शेअर अधिक परतावा मिळवून देऊ शकतात? अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केटची दिशा काय असते आणि या दिवशीचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…
गेल्या आठवड्यामध्ये शेअर मार्केट जवळपास 7 टक्क्यांच्या आसपास कोसळले होते. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये लाल निशाण फडकले होते. परंतु सोमवारी बाजाराने निराशेची ढगं बाजूला सारून हिरवे निशाण फडकावले. सेन्सेक्स 813 पॉइंट, निफ्टी 237 पॉइंट आणि बँक निफ्टी 285 पॉइंट वाढला. त्यामुळे आज मार्केट हिरवा झेंडा फडकावणार की लाल निशाण याकडे सर्व शेअर धारकांचे लक्ष असणार आहे.
इतिहास काय शिकवतो?
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट अक्षरश: हेलकावे खात असते. अर्थमंत्र्यांनी एखाद्या सेक्टरला झुकते माप दिल्यास त्या सेक्टरचे आणि संबंधित शेअर तुफान धावतात. गेल्या वर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात हिरवा झेंडा फडकला होता. शेअर मार्केट तब्बल 5 टक्के वर पळाले होते. मात्र त्याआधीच्या वर्षी अर्धात 2020 ला शेअर मार्केटने लाल निशाण फडकाले होते आणि मार्केट 3.44 टक्के कोसळले होते.
मोदींच्या कार्यकाळात बजटेच्या दिवशी मार्केट असे राहिलेय
2021 – मार्केट 4.74 टक्क्यांनी वाढले
2020 – 2.51 टक्क्यांनी कोसळले
2019 – 1.14 टक्क्यांनी कोसळले
(पियुष गोयल यांनी 1 तारखेला बजेट मांडल्यानंतर मार्केट 0.58 टक्के वाढले होते)
2017 – 1.81 टक्क्यांनी वाढले
2016 – 0.61 टक्क्यांनी कोसळले
2015 – 0.65 टक्क्यांनी वाढले
2014 – 0.23 टक्क्यांनी कोसळले
या सेक्टरच्या शेअर ठेवा नजर
1. Capital Goods – लार्सन अँड टुब्रो (Larsen Toubro), सिमेंस (Siemens), भारत इलेक्ट्रॉनिक्स (Bharat Electronics) आणि फिनोलेक्स केबल्स (Finolex Cables)
2. Bank – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), कॅनरा बँक (Canara Bank) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
3. रियल एस्टेट – डीएलएफ (DLF), ओबेरॉय रियलिटी आणि प्रेस्टिज एस्टेट (Prestige Estate)
4. एफएमसीजी – आयटीसी (ITC), डाबर इंडिया (Dabur India)
5. हेल्थकेयर – सन फॉर्माश्यूटिकल (SUN Pharma) आणि ग्लँड फार्मा (Gland Pharma)
6. ऑटोमोबाइल – बजाज ऑटो (Bajaj Auto), महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) आणि एंड्युरेंस टेक्नोलॉजी (Endurance Technologies)
7. Power – टाटा पावर (Tata Power) आणि पॉवर ग्रिड कॉरपोरेशन (Power Grid Corporation)
(वरील शेअर एक्स्पर्टच्या अंदाजानुसार देण्यात आले आहेत, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी अभ्यास करा आणि मगच रिस्क घ्या)




























































