‘सी फ्रॉम द हार्ट’ या डोळे बांधून धावण्याच्या शर्यतीचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एनसीपीए येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सी फ्रॉम द हार्ट’ या डोळे बांधून धावण्याच्या स्पर्धेत १००हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.चेन्नई येथील २० वर्षीय व्ही दिव्या या मुलीला ‘स्पिरीट ऑफ पिंकाथॉन रन’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून हे आयोजन केले गेले. व्ही दिव्या ही ‘स्पिरीट ऑफ पिंकाथॉन रन’मध्ये सहभागी होणारी पहिली अंध मुलगी आहे. ही स्पर्धा पुडुचेरी ते चेन्नई अशी आयोजित करण्यात आली असून ‘पिंकाथॉन’चा मार्गदर्शक मिलिंद सोमण याच्या नेतृत्वाखाली महिलांमध्ये आरोग्य आणिफीटनेसचा संदेश पसरवण्यासाठी हे आयोजन होत आहे.