भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाला मंत्रिमंडळाची मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्णतः मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरातील विद्यापीठांमधील अध्यासन केंद्रांना 3 कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झाला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पहिला निर्णय होता की भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर हे जे महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय झालेला होता, त्याला आज पूर्णतः मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यापीठात असलेल्या अध्यासन केंद्रांना प्रत्येकी 3 कोटी रुपयांचा ठोक निधी द्यायचा. एकदाच निधी द्यायचा आणि दरवर्षी त्या व्याजातील 17 लाखातून ही अध्यासन केंद्र चालवायची, असाही निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला.