
खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या कॅनडात झालेल्या हत्येनंतर हिंदुस्थान आणि कॅनडात प्रचंड तणाव वाढला आहे. केंद्र सरकारनं आधीच दिलेल्या ‘डेडलाइन’च्या दरम्यान कॅनडाने आपल्या बहुतेक राजनैतिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हिंदुस्थानातून बाहेर काढलं आहे. कॅनडाच्या सीटीव्ही न्यूजनं हे वृत्त दिल्याचं सांगितलं जात आहे.
हिंदुस्थाननं कॅनडाला आपल्या राजनैतिक कर्मचाऱ्यांना परत बोलवण्याचे आदेश दिल्यानंतर कॅनडाच्या सरकारनं हिंदुस्थानातील बहुतेक राजकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बाहेर काढलं आहे. कॅनडाच्या सीटीव्ही न्यूजच्या वृत्तानुसार, नवी दिल्लीच्या बाहेर काम करणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांना क्वालालंपूर किंवा सिंगापूर येथे हलवण्यात आले आहे.



























































