
सामना प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गुरुवारी पोलिसांनी 18 लाख 81 हजार रुपयांची रोकड पकडली. पोलिसांना शरद रामटेके नावाचा इसम आपल्या दुचाकीमध्ये ही रक्कम घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून पोलिसांनी हे वाहन येताच त्याची तपासणी केली असता डिकीतून 18 लाख 81 हजार रुपये सापडले.
रक्कम मोठी असल्याने निवडणूक अधिकाऱयांनी आयकर विभागाला चौकशीचे निर्देश दिले. पोलिसांनी शरद रामटेके यास ताब्यात घेतलं आहे. ही रक्कम नेमकी कशासाठी नेली जात होती, कुणाची होती, राजकीय पक्षांचा काही संबंध आहे काय, याचा तपास सुरू आहे.





















































