
विमानातील वैमानिकांच्या केबिनमध्ये असलेल्या मांजरीने वैमानिकांवर हल्ला केला. आश्चर्य म्हणजे बरेच प्रयत्न करूनही या मांजराला पकडणे त्यांना शक्य झाले नाही. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे हे विमान पुन्हा माघारी न्यावे लागले होते.
एका विमानातील कॉकपिटमध्ये मांजर शिरले. येथे असणाऱ्या वैमानिकांवर मांजराने हल्ला केला. या मांजराला पकडण्यासाठी वैमानिकांनी बरेच प्रयत्न केले, पण आक्रमक झालेले मांजर वैमानिकांच्या आणि विमानातील इतर कर्मचाऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे वैमानिकांनी सुदानची राजधानी असलेल्या खार्टूम विमानतळावरून हे विमान प्रवासाकरिता निघाले होते, मांजर हल्लामुळे झालेल्या गोंधळामुळे वैमानिकांनी पुन्हा खार्टूम विमानतळावरच जाण्याचा निर्णय घेतला.
वैमानिकांच्या केबिनमध्ये मांजर सापडल्यामुळे अर्धा तास विमान हवेत तरंगत ठेवावे लागले. खार्टूम विमानतळावर एका हँगरवर प्रवासाकरिता निघणारे हे विमान उभे करण्यात आले होते. हे मांजर या हँगर परिसरात फिरत आलं असावं आणि मग ते विमानात शिरण्याची शक्यता वैमानिकांनी व्यक्त केली आहे. मांजर अचानक कॉकपिटमध्ये आले आणि आक्रमक होऊन तिने वैमानिकांवर हल्ला केला. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे खार्टूम विमानतळावरून प्रवासाकरिता निघालेल्या या विमानाला पुन्हा याच विमानतळावर लँण्ड करण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नव्हता, अशी माहिती केबिन क्रू सदस्यांनी दिली आहे.