
सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे आज दिल्लीत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. गुरुवारी त्यांचा कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
कोळसा घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सीबीआयनेच त्यांच्यावर खटला दाखल केला आहे. त्यांच्यावर याप्रकरणी एफआयआर देखील दाखल आहे.
Ranjit Sinha, 1974 batch retired IPS officer, who held various senior posts including that of CBI director and DG ITBP, passed away today around 4:30 am in Delhi.
(File photo) pic.twitter.com/58GKPE2PvP
— ANI (@ANI) April 16, 2021
1974 चे आयपीएस अधिकारी असलेले रणजीत सिन्हा हे 2012 ते 2014 पर्यंत सीबीआयचे संचालक होते. त्याआधी ते इंडो तिबेट बॉर्ड़र पोलीस (ITBP)चे महासंचालक होते. तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे देखील त्यांनी नेतृत्व केले आहे.






























































