पूंछमध्ये पाकड्यांचा गोळीबार; एक जखमी

284

पाकिस्तानी सैन्याने आपले नापाक इरादे अजूनही सोडलेले नाहीत. काहीही कारण नसताना त्यांनी जम्मू-कश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये सोमवारी रात्री शस्त्रसंधी मोडत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तुफान गोळीबार केला. या गोळीबारात शाहपूर-ए भागात राहणारे 30 वर्षीय नागरिक मोहम्मद शौकत जखमी झाले आहेत. ते लष्करात पोर्टरचे काम करतात. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. पाकिस्तानी सैनिक शौकत यांच्या गावाला नेहमी लक्ष्य करून 120 एमएम मॉर्टलने गोळीबार करत असतात. सोमवारी रात्री पाकड्यांच्या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांनीही चोख उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या