
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
संस्कृत भाषेचे संवर्धन आणि या भाषेचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय संस्थांनजीक किमान दोन संस्कृत भाषिक गावे विकसित केलीच पाहिजे, असे ठाम मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी गुरुवारी व्यक्त केले. केंद्रीय भाषा संस्थांच्या प्रमुखांची बैठक गुरुवारी पोखरियाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी भाषा संस्थांनी भक्कम आणि प्रभावी राहिलेच पाहिजे, असे पोखरियाल यांनी नमूद केले, तर दुसऱया बैठकीत विद्यापीठांना त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी ‘ब्लू पिंट’ बनवण्याचे निर्देश दिले. याबाबत आपला पूर्ण पाठिंबा असेल, असेही ते म्हणाले.

























































