
निवडणुकांची चाहूल लागताच केंद्रातील मोदी सरकार गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करते. पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीला आता अवघे तीन ते चार महिने उरले आहेत. त्याआधी जनतेला खूश करण्यासाठी पेंद्रातील मोदी सरकार एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला पेंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 10 रुपयांनी स्वस्त करण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 8 ते 10 रुपयांची कपात करून मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. जर कच्च्या तेलाची किंमत 80 डॉलर किंवा त्याहून कमी राहिली तर जानेवारीच्या सुरुवातीला इंधनाचे दर कमी होतील. यावर पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयामध्ये बराच काळ चर्चा सुरू होती असे समजते.
पाच प्रमुख शहरांतील प्रतिलिटर दर
मुंबई :- पेट्रोल- 106.31 रुपये, डिझेल- 94.27 रुपये
नवी दिल्ली :- पेट्रोल- 96.72 रुपये, डिझेल- 89.62 रुपये
कोलकाता :- पेट्रोल- 106.03 रुपये, डिझेल- 92.76 रुपये
चेन्नई :- पेट्रोल- 102.63 रुपये, डिझेल- 94.24 रुपये
बंगळुरू :- पेट्रोल- 101.94 रुपये, डिझेल- 87.89 रुपये
























































