पावसामुळे मध्य रेल्वे अर्धा तास उशिराने, स्थानकांवर गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

विकेंडच्या मुहूर्त साधत पावसाने आज दमदार बॅटिंग केली आहे. अनेक स्थानकांवर आणि रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी, पावसाने कोलमडलेलं वेळापत्रक यांमुळे मुंबईकरांची पुरती दैना उडाली.

आता पाऊस ओसरला असला तरीही रेल्वे मार्ग मात्र अजून पूर्णपणे सावरलेला नाही. पावसाचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेला बसला असून मध्य रेल्वेवर गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत. विशेषतः कर्जत मार्गे जाणाऱ्या गाड्या १ तास उशिराने धावत आहेत. गाड्यांच्या विलंबामुळे स्थानकांवर गर्दी उसळलेली दिसत आहे.