मध्य रेल्वेकडून ई बाईक्सला प्रोत्साहन, नऊ स्थानकांवर सेवा उपलब्ध होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने ई बाईक्सना प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली आहे. यासाठी रेल्वेने मुंबईतील 8 स्थानकांवर या ऍप आधारित ई बाईक्ससाठी जागाही देण्यात आली आहे. प्रवाशांना या बाईक्सचा वापर करून आपल्या गंतव्य ठिकाणी जाण्यास मदत होणार आहे.

मध्य रेल्वे ई बाईक्स सेवा पुरवणार्‍या कंपनींला ही जागा भाडेतत्वावर देणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून रेल्वेला वर्षाला 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ई बाईकची सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, परळ, दादर, भांडूप, मुलूंड आणि ठाणे स्थानकावरून  मिळणार आहे. मध्य रेल्वे या बाईक्ससाठी चार्जिंग स्टेशन आणि पार्किगची जागाही उपलब्ध करून देणार आहे.

बीकेसीचा यशस्वी उपक्रम

31 ऑगस्ट 2020 रोजी वांद्रे स्थानकावर ई बाईक्सचा प्रायोगिक तत्त्वावर शुभारंभ करण्यात आला होता. डिसेंबर 2020 पर्यंत सात हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला होता.