मध्य रेल्वेचा ‘गो ग्रीन’ उपक्रम

मध्य रेल्वेने गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हॉल येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांच्या हस्ते ‘गो ग्रीन’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मीना यांच्यासह सर्व विभागप्रमुख, मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरण शपथ घेतली. रेल्वे बोर्डाचे सदस्य ट्रक्शन अॅण्ड रोलिंग स्टॉक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शपथ दिली. तसेच वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत 100 रोपे लावण्यात आली. त्याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता रॅली काढण्यात आली.