
सामना ऑनलाईन । कल्याण
मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकाजवळ गोदावरी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. इंजिन बिघाड झाल्यामुळे गोदावरी एक्सप्रेस जागीच थांबली असून कर्जत आणि कसारा मार्गावरून येणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक बिघडलं असून प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत. साम या वृत्तवाहिनीने यासंदर्भात माहिती दिली आहे.






























































