रेल्वेची भंगार विक्री जोरात, वर्षभरात 483 कोटी रुपयांची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने आपल्या कारशेडबरोबरच स्थानके भंगारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अडगळीत पडलेले भंगार विक्री केली जात असून त्या माध्यमातून रेल्वेने वर्षभरात तब्बल 483 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

रेल्वेला पावणे दोनशे वर्षांचा इतिहास असल्याने अनेक ठिकाणी जुने रूळ, पादचारी पूल, वाहनांसाठीचे मोठे पूल आहेत. सदरचे पूल, जुनी यंत्रणा काढून रेल्वेकडून नवीन यंत्रणा उभी केली जात आहे. त्यामुळे रेल्वेकडे मोठय़ा प्रमाणात भंगार निघत आहे. ते ठेवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जागा लागत असल्याने त्याची तत्काल विल्हेवाट लावली जात आहे. त्या माध्यमातून रेल्वेला वर्षाला शेकडो कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून 483 कोटी रुपये मिळाले आहेत, तर 2021-22 मध्ये 355 कोटी रुपये मिळाले होते. भंगाराची विल्हेवाट लावल्याने रेल्वेला केवळ महसूलच मिळाला नाही, तर परिसर स्वच्छ होण्यास मदत झाली आहे.