चांदिवलीतील पाणी प्रश्नावर शिवसेनेचा हल्लाबोल, वरळीतील जल अभियंत्याच्या दालनात निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांदिवली विधानसभा क्षेत्रातील डोंगराळ भागात कमी दाबाने व दूषित पाण्याचा पुरवठय़ाच्या निषेधार्थ आज शिवसेनेने वरळीच्या जल अभियंत्यांच्या दालनात काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला आणि जोरदार निदर्शने केली. दरम्यान, दिवाळीपूर्वी या विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन जल अभियंत्यांकडून देण्यात आले.

चांदिवली विभागातील नारायणनगर, हनुमाननगर, केवट चाळ, गुरू नानकनगर, संजयनगर, अशोकनगर इत्यादी डोंगराळ भागामध्ये गेले अनेक महिन्यांपासून अतिशय कमी दाबाने व दूषित पाण्याचा पुरवठा होतो. सध्यस्थितीत मुंबईला करणारी धरणे पूर्ण भरली असतानादेखील अपुर्या होणार्या पाणीपुरवठयामुळे या परिसरातील हवालदिल झाले आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा नियमित करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी केली. यावर दिवाळीपूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन जल अभियंता अजय राठोर यांनी दिले. यावेळी नगरसेवक किरण लांडगे, शाखाप्रमुख नितीन गोखले, शैलेश निंबाळकर, बाबू मोरे, मयूर राठोड, महिला शाखा संघटिका पार्वती शिंदे, श्वेता मसुरकर, पार्वती दारपुंडे तसेच काजूपाडा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी सुनील जैन आदी उपस्थित होते.