
आई-वडिलांना शिव्या देणे अत्यंत चुकीचे आहे. मराठी माणसे असे कधीही करत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या असे सांगणे हे योग्य आहे असे मला वाटत नाही. मोदी – शहांची तुलना आई-वडिलांशी करणे हे तर अत्यंत चुकीचे आहे. हे हिंदू संस्कृतीमध्ये बसत नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तळी उचलण्याची एकही संधी भाजपाई सोडत नाहीत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर चक्क वरताणच केली. ‘‘आई-वडिलांना शिव्या द्या, चालेल. आईवरून शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना शिव्या देणं मी सहन करू शकत नाही,’’ असे चंद्रकांतदादांनी भाजपचा केंद्रीय नेता आणि राजू शेट्टी यांच्या संवादाचा हवाला देत सांगितले. याबाबत जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपले मत व्यक्त केले.
View this post on Instagram
दरम्यान, रश्मी शुक्ला यांना क्लीनचीट देण्यात आल्याच्या वृत्तावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू होती. त्या प्रकरणात नेमके काय समोर आले आहे आणि क्लोजर रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे हे पाहिल्याशिवाय त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. जर क्लीनचीट दिली असेल तर त्यामध्ये त्याची कारणे लिहिली असतील असेही जयंत पाटील म्हणाले.
धन्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचेच आहे!
उद्धव ठाकरे यांच्या सभेने खरी शिवसेना कुणाची हे स्पष्ट झाले आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचेच आहे. जर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह दिले तर त्यांच्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केले जाईल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
बीकेसीवरील मेळाव्यावर प्रतिक्रिया
शिंदे गटाच्या सभेला एवढा खर्च करण्यात आला. लोकांना अक्षरशः कोंबून मुंबईला आणले त्यांना माहिती देखील नव्हती असे सांगतानाच या सर्व प्रकाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.





























































