पिकनिकला गेलेल्या विद्यार्थ्यांना मांसाहारी जेवणातून विषबाधा, 11 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरमधील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेक बोरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सहल शाळेतील शिक्षकांनी वडोली मार्गावर असलेल्या इको पार्क मध्ये नेली होती. पार्कमध्ये विद्यार्थ्यांना मांसाहारी जेवण दिले गेले होते. त्यातून अकरा विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालय गाठल. विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जात असताना याची माहिती पालकांना देणं गरजेचं होत. मात्र शिक्षकांनी लोकांना माहिती दिली नसल्याचं पालकाच म्हणणं आहे. या प्रकारावर पालकानी संताप व्यक्त केला आहे