लॉकडाऊनच्या काळात चंद्रपूरमध्ये 25 कोटी रुपयांची अवैध दारू जप्त

chandrapur 25 crore illegal trade of liquor seized

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनची स्थिती असतानाही दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 25 कोटींची दारू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले. तेव्हापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजे सुमारे पाच महिन्यात या जिल्ह्यात दारूचा महापूर सुरूच होता, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या पाच महिन्यांच्या काळात पोलिसांनी 3409 गुन्हे दाखल केले. मात्र त्या तुलनेत आलेली दारू अमाप आहे. एकूण 24 कोटी 65 लाख रुपयांची दारू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात देशी आणि विदेशी दारूचाही समावेश आहे. जिल्ह्याच्या सीमा सील असतानाही दारूची आवक कशी झाली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. येथे क्लिक करा आणि पहा व्हिडीओ.

https://business.facebook.com/saamanaonline/videos/437882453840757/

राज्यात 5 मे पासून दारू दुकाने सुरू करण्यात आली. त्यानंतर या जिल्ह्यातील आवक पुन्हा वाढली. ही आवक अजूनही सुरू आहे. आतातर इथं टोळ्या तयार झाल्या असून, त्यातून हिंसा वाढीस लागली आहे. बल्लारपूर येथील दारूविक्रेता सुरज बहुरीया याचा अशाच गॅंगवॉरमुळे खून झाल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंत 25 कोटींची दारू पकडण्यात आली आहे. म्हणजे विकली गेलेली दारू किती असेल, याचा सहज अंदाज येतो. या अवैध दारूविक्रीतून दारुबंदी हटवण्याची मागणीही आता मागे पडू लागली आहे.

मार्च ते ऑगस्टदरम्यानचे विविध गुन्हे

1) दारू – 3409
2) इतर गुन्हे – 3124
3) खून – 25
4) जीवानिशी मारण्याचा प्रयत्न – 24
5) बलात्कार – 62

एकूण – 6533

आपली प्रतिक्रिया द्या