चंद्रपूर – 65 वर्षीय शिवसेनेच्या वाघिणीची धाडसी कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या वाघिणीची धाडसी कामगिरी चंद्रपूर शहरातील नागरिकांना अनुभवायला मिळाली. जिल्ह्यात गेल्या 5-6 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरण 100 टक्के भरले आहेत. त्यातच इरई धरणाचे पाणी 2 मीटरने सोडल्याने शहरालगत असलेल्या राष्ट्रवादी नगर, तुलसीनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी अचानक शिरल्याने शेकडो लोकांची घरे पाण्याखाली गेली व अनेक जण पाण्यात अडकले होते.

त्यावेळेस पाण्यात अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी स्वतःची पर्वा न करता 65 वर्षीय शिवसेनेची वाघीण माजी जिल्हा महिला संघटिका कुसुमताई उदार यांनी धावून जात पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेकडो नागरिकांना पाण्यातून काढले आणि सुरक्षितस्थळी हलवण्यास मदत केली.

त्यांची राहण्याची व्यवस्था केली. या धाडसी कामगिरीचे परिसरात व जिल्ह्यात कौतुक होत आहे. या शिवसेनेच्या धाडसी वाघिणीचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले. शिवसेना जिल्हा प्रमुखांनी मदतीसाठी शिवसेना कार्यालयात संपर्क साधण्याचे आव्हान केलं आहे.