चंद्रपूरमध्ये किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात किरीट सोमय्या विरोधात जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात नारेबाजी करत चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.

2013 मध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू केली होती. केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थता दर्शवल्यानं किरीट सोमय्या पुढे आलेत. निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर, विमानतळावर डबे घेऊन उभा राहिला. आयएनएस विक्रांत हा देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्यानं लोकांनी सरळ हस्ते दान केलं. नेव्हीनगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी 5 ते 10 हजार रुपये दिले.

या रकमेचं किरीट सोमय्याने काय केलं ते देशाला समजायला हवं, ही रक्कम तो भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होता. मात्र सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे. गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी दिला. यावेळी तालुका संघटक मनीष जेठणी, शहर प्रमुख संदीप मेश्राम, भूषण बुरीले, नगरसेवक दिनेश यादव, उपतालुका प्रमुख सागर पिपालशेंडे, विपीन काकडे सह शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी होते.