
आगामी लोकसभा निवडणुकीआधीच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देशम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणीत भर पडली आहे. 114 कोटी रुपयांच्या कथित एपी फायबरनेट घोटाळाप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या एसीबी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपपत्रामध्ये चंद्राबाबू नायडू यांना मुख्य आरोपी बनण्यात आले आहे तर हैदराबादमधील नेट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. हरी कृष्णा प्रसाद, आयआरटीसी अधिकारी संबाशिव राव यांचेही नाव या आरोपपत्रात आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एपी फायबरनेट प्रकल्पाच्या अंदाजित रकमेला मंजुरी दिली. तसेच हरी कृष्णा प्रसाद यांची निविदा मुल्यमापन समितीवर निवड व्हावी यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी शासकीय अधिकाऱयांवर दबाव टाकला. टेरासॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढण्यात आले. निविदा प्रक्रियेत हेराफेरी करण्यात आली, असा चंद्राबाबू नायडू यांच्यावर आरोप आहे.





























































