चेंबूरमध्ये सिलेंडर स्फोट, पाच घरं कोसळली; सहा जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील चेंबूरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन पाच घरं कोसळल्याची घटना घडली आहे. घरं कोसळल्याने अनेकजण ढीगाऱ्याखाली अडकल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती तत्काळ अग्नीशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून 11 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या लोकांपैकी सहा जणांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी चेंबूर कॅम्प परिसरात घडल्याचे नगर निगम अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी चेंबूर कॅम्प परिसरात सकाळी अचानक सिलेंडचा स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत सहा लोकं जखमी झाली आहेत. ही घटना चेंबूर येथील गोल्फ क्लबच्या जवळ ओल्ड बॅरक येथे सकाळी 7 वाजून 50 मिनीटांनी घडली. नगर निगमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका घरात गॅसचा स्फोट झाला आणि एकमजली पाच घरं कोसळली.

सिलेंडर स्फोटात कोसळलेल्या घरांमधील 11 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. आतापर्यंत चार लोकांना गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या, पोलीस, नगर निगमचे कर्मचारी, रुग्णवाहीका आणि अन्य एजन्सीन्ना पाठवण्यात आले आहे.

;s