जनता कर्फ्यूमुळे चिकन-मटणा व वाईन शॉपच्यासमोर लांबच लांब रांगा

उद्या रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पूर्वसंध्येला कोल्हापूरकरांनी चिकन-मटणच्या दुकानासमोर अक्षरशः रांगा लावल्या. हीच परिस्थिती वाईन शॉप सोमवारीही दिसून येत होती.

जगभरात थैमान माजविणारा कोरोनाचा दुसरा टप्पा सध्या देशात सुरू आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, यासाठी उद्या रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार बंद होणार आहेत. दिवसभर घरीच बसावे लागत असल्याने काहींनी मित्रांसह ठिकठिकाणी दारू-मटण पार्टीचे आयोजन केले आहे .या पार्श्वभुमीवर आज पूर्वसंध्येला चिकन-मटनच्या दुकानासमोर नागरिकांनी रांगा लावल्या. गेल्या काही दिवसां- पासून चिकन विक्री व्यवसाय पुरता कोलमडून गेला होता. फुकट तरी घ्या म्हणण्याची वेळ पोल्ट्री चालकांवर आली होती. तरीसुद्धा एक-दोन आठवड्यापासून अवघ्या तीस-चाळीस रुपये किलो दराने मिळणारे चिकन सायंकाळी शंभर रुपये किलो दराने विक्री होत होते. त्यात मटणाचा तुटवडा पुन्हा निर्माण झाल्याने,चिकन विक्रीच्या दुकानासमोर नागरिकांनी रांगाच लावल्या होत्या. अशीच स्थिती वाईन शॉप समोर ही दिसून येत होती.एकिकडे नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून शाळा, महावि.र आज लागलेल्या रांगा आणि झालेली गर्दी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या