बहुमत चाचणीनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीने शनिवारी विधानसभेत बहुमताची चाचणी पार केली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 169 आमदारांनी आपला पाठिंबा दर्शवला. तर ४ आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. बहुमताची चाचणी यशस्वी पार केल्याने राज्यभरात शिवसेनेच्या नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचे कौतुक केले आहे.

‘राज्यातील सत्तापरिवर्तनासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. या लढाईतील खरे योद्धा खासदार संजय राऊत हेच असून त्यांचा सिंहाचा वाटा काणेही विसरू शकत नाही. काँग्रेस जनांच्या वतीने मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो,’ असे विनायक देशमुख यांनी म्हटले आहे.