चीनमध्ये पुन्हा कोरोना; नव्या लॉकडाऊनची तयारी

चीनमधून कोरोना जगभर पसरला तेथेच पुन्हा संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. चीनमध्ये कोरोना पुन्हा पसरत असून नव्या लॉकडाऊनची तयारी सुरू आहे. मार्चमध्ये कोरोना व्हायरस जगभर पसरला आणि हाहाकार माजला. मात्र, मार्चमध्येच चीन येथे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. चीनमध्ये आतापर्यंत 85826 रुग्णसंख्या आहे. त्यातील 80928 रुग्ण बरे होऊन परतले.

50 लाख चाचण्या

  • चीनच्या झिंजियांग प्रातांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या सुरू आहेत. 50 लाख चाचण्या करण्यात येणार आहेत. आठवड्यापूर्वी एका कापड कारखान्यात 17 वर्षीय मुलगी कोरोनाबाधित आढळली. गेल्या काही दिवसांत 264 जणांना संसर्ग झाला असून, चार जणांची प्रकृती गंभीर आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
  • चीनमध्ये कोरोना पुन्हा पसरत असून, लॉकडाऊनची तयारी सुरू आहे.
  • शिनजियांग प्रांतामध्येही मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या सुरू आहेत. या प्रांतात एक कोटींहून अधिक उइगर मुस्लीम नागरिक राहतात.
आपली प्रतिक्रिया द्या