चीनमध्ये 24 तासांत एकही नवीन रुग्ण नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात हाहाकार माजविणाऱया ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यात चीनला यश आल्याचे आशादायक चित्र आहे. गेल्या 24 तासांत चीनमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही, असे वृत्त आहे. दरम्यान, इतर देशांमध्ये कोरोनाचा जीवघेणा संसर्ग सुरूच आहे. मृतांची संख्या 9 हजारांवर गेली असून, इटलीमध्ये भयंकर स्थिती आहे. येथे रोज सरासरी 350 जणांचा मृत्यू होत आहे. जगभरात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 2,22,000 वर गेली आहे. 23 जानेवारीला चीनच्या वुहान शहरात ‘कोरोना’ व्हायरसचा पहिला रुग्ण मृत्युमुखी पडला आणि गेल्या 48 दिवसांत वुहान आणि चीनच्या इतर भागात 3249 जणांचा मृत्यू झाला. वुहानसह अनेक शहरे शटडाऊन करण्यात आली. लोकांना घराबाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घातली. यानंतर आता चीन हळूहळू सावरत आहे. 24 तासांत एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याचा चीन सरकारचा दावा आहे.