चिपळूण : उड्डाणपुल कोसळल्या प्रकरणी ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे उड्डाणपुल कोसळला होता. या उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या मूळ ठेकेदार कंपनी, पोट ठेकेदार कंपनी व संबंधित सल्लागार कंपनी यांना शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुढील काही दिवसात केंद्रीय समितीही चिपळूणमध्ये येऊन कोसळलेल्या पुलाची पाहणी करणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालय असा सुमारे १.८३ किमीचा उड्डाणपुल उभारला जात आहे. पुलाच्या पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरु असताना सोमवारी दुपारी पुलाचा काही भाग कोसळला. त्यानंतर कामाच्या दर्जाबाबत शंका घेण्यात आली. या उड्डाणपुलाचा मूळ ठेका एका ठेकेदाराकडे आणि पोट ठेका दुसऱ्या कंपनीकडे देण्यात आला होता. या दोघांनाही शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.