लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ख्रिश्चन पादरीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोची

केरळमध्ये सात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी एका पादरीला अटक करण्यात आली आहे. सातही मुलांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही करवाई केली आहे.

कोचीमध्ये पेरुंपडम बॉईज होम या वसतिगृहाचे संचालक जॉर्ज उर्फ जेरी हा कित्येक दिवस या बालकांवर अत्याचार करत होता. या वसतिगृहाची देखरख हा पादरीच करत होता. जेव्हा जेव्हा मुले या पादरीच्या अत्याचाराला विरोध करत तेव्हा तो मुलांवर ओरडत तसेच त्यांना मारहाणही करायचा.

अखेर शनिवारी या अत्याचाराला कंटाळून एका मुलाने या वसतिगृहातून पळ काढला आणि या झाला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. पीडीत मुलाच्या आई वडिलांनी थेट पोलीस स्थानक गाठले आणि या नराधम पादरीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात नेले. न्यायलायात त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.