डोक्यात दगड घालून सफाई कर्मचाऱ्याचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भोकर

अज्ञात कारणावरून येथील नगर परिषदेतील कंत्राटी सफाई कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने घटनास्थळी नागरीकांनी एकच गर्दी केली. प्रमोद मधुकर कांबळे (३२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

भोकर नगर परिषदेत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले सफाई कामगार प्रमोद कांबळे (रा.रशिद टेकडी, भोकर) यांच्या डोक्यात बसस्थानकाच्या पाठीमागील नाल्यात अज्ञात व्यक्तीने मोठा दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. शनिवारी सकाळी सदर घटना उघडकीस आली. खुनाची बातमी शहरात पसरताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली. खूनामागील कारण स्पष्ट झाले नसून मयताचा भाऊ प्रविण मधुकर कांबळे यांच्या फिर्यादीवरुन भोकर पोलीसात कलम ३०२ नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील चव्हाण करीत आहेत.